कर्मयोग आणि धर्मायोग
यांची जेव्हा अचुक सांगळ बसते तेव्हा इतिहासात नोंद होईल अशा पराक्रमांची उत्पत्ती
होते. याचे सुरेख आणि नेत्रादिपक असे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे छत्रपती महाराज आणि
रामदास स्वामी यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर सुवर्णाक्षरांनी एकत्रित लिहिलेला इतिहास.
एकीकडे
राजश्रियाविराजीत,
सकाळगुणमंडित,
क्षत्रियकुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक
हिन्दुपदपातशहा श्रीमान् महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ऽ ऽ ऽ. . .
असे म्हणत मराठी रयत
मनामध्ये स्वराज्याचे तोरण फुलवत होती तर दुसरीकडे बलोपासना आणि धर्म यांची सांगळ
घालत रामदासांचे होती.
शिवाजी महाराजांचे
अध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी यांनी महाराजांना एक पत्र लिहिले होते. आपण
आज महाराजांना ज्या शब्दार्थी आभूषणान्णी गौरवतो ते सर्व या पत्रातली आहेत……
ते पत्र पुढील
प्रमाणे होते.
निश्च्याचा महमेरु ।
बहुतजनांस आधारु
अखंड स्थितीचा
निर्धारु । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिया राशी । उदंड
घडती जयाशी
तयाचे
गुणहट्टत्त्वाशी । तुळणा कैशी ?
नरपती,
हयपती । गजपती, गडपती
पुरंधर आणी शक्ति ।
पृष्ठभागी ॥
येशवंत,
किर्तिवंत । सामर्थ्यवंत,
वरदवंत
पुण्यवंत आणि जयवंत ।
जाणता राजा ॥
आचारशील,
विचारशील । दाणशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील ।
सर्वांठायी ॥
धीर,
उदार, सुंदर । शुर क्रियेसी तत्पर
सावधपणेसी नृपवर ।
तुच्छ केले ॥
तीर्थक्षेत्रे ती
मोडिली । ब्राह्मणस्थाने बिघडली
सकळ पृथ्वी आंदोळली ।
धर्म गेला ॥
देवधर्म,
गोब्राह्मण । करावयासी रक्षण
हृदयस्थान झाला
नारायण । प्रेरणा केली ॥
उदंड पंडित,
पुराणिक । कवीश्वर, यज्ञिक,
वैदिक
धूर्त,
तार्किक, सभानायक । तुमचे ठायी ॥
या भूमंडळाचे ठायी ।
धर्म रक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म
राहिला काही । तुम्हा करिता ॥
आणखी काही धर्म चालती
। श्रीमंत होऊन कित्येक असती
धन्य धन्य तुमची
कीर्ती । विस्तारली ॥
तुमचे देशी वास्तव्य
केले । परंतु वर्तमान नाही घेतले
ऋणानुबंध विस्मरण
जाहले । बा काय नेणू ?
उदंड राजकारण तटले ।
तेथ चित्त विभागले
प्रसंग नसता लिहिले ।
क्षमा केली पाहिजे ॥
Nishchayacha mahameru;
bahutjanaas adharu
Akhand stiticha
nirdharu; shrimant yogi
Paropkarachiya rashi;
udand ghadti jayashi
Tayache gunhattatvashi;
tulna kaishi?
Narpati haypati;
gajpati gadpati
Purandhar ani
shakti; prushtabhagi
Yeshwant kirtiwant;
samarthyawant varadwant
Punyawant ani
jaywant; janta raja
Acharshil vicharshil;
danshil dharmashil
Sarvadnyapane
sushil; sarvanthayi
Dhir, udar,
sundar; shur kriyeshi tatpar
Savadpaneshi nrupwar;
tucchha kele
Tirthaksetre ti
modili; brahmansthane bighadli
Sakal pruthvi
andolli; dharma gela
Devdharma, gobrahman;
karavayashi rakshan
Hrudaystan zala
narayan; prerna keli
Udanda pandit,
puranik; kavishwar, yadnik, vaidik
Dhurta, tarkik,
sabhanayak; tumche thayi
Ya bhumandalache
thayi; dharma rakshi yesa nahi
Maharashtra dharma
rahila kahi; tumha karita
Ankhi kahi
dharma chalati; shrimant houni kityek asti
Dhanya dhanya
tumchi kirti; vistarli
Tumche deshi
vastavya kele; parantu vartaman nahi ghetle
Hrunanubandha vismaran
jahale; ba kay nenu?
Udanda rajkaran
tatle; teth chitta vibhagle
Prasang nasta
lihile; kshama keli pahije
Very good website, thank you.
ReplyDeleteOdia Book Abyakta
Order Odia Books
Odia Books Online